अपघातग्रामीण वार्ताजिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

दुचाकीची समोरासमोर धडक; एक जागीच ठार.

जिंतूर-जालना महामार्गावरील आठवड्यातील दुसरी घटना

जिंतूर (अजमत.पठाण):

               जिंतूर-जालना महामार्गावरील मालेगाव शिवारात (दि.०२) रोजी सायंकाळी ६:३० ते ७ वाजण्याच्या सुमारास दोन मोटरसायकलचा समोरासमोर अपघात. घटनेची माहिती मिळताच जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक शिंदे व त्यांचे सहकारी पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व अपघाती ना एका खाजगी वाहनाने जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की जिंतूर तालुक्यातील दाभा-डीग्रस येथील रहिवासी बाबुराव गोविंद घुगे ( वय ५० वर्ष) व विष्णू सुभाष घुगे (वय ३४ वर्षे) दुचाकी क्र.एम.एच. २२.ए. बी. २७२१ ने जिंतूर कडे येत असताना, जिंतूर येथून देवगाव फाट्याकडे जाणाऱ्या, रा. बोरकीनी ता. सेलू येथील पांडुरंग अंबादास मुसळे (वय ४२ वर्ष) व सुरेश लिंबाजी मुसळे (वय ३० वर्ष) दुचाकी क्र. एम. एच. ३८. यु १२१० या मोटरसायकलींचे समोरासमोर धडक झाली. जिंतूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय येथील डॉ. खान यांनी विष्णू सुभाष घुगे यांना मृत घोषित केले. रुग्णालयातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. खान व नर्स शिंदे यांनी तात्काळ प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथे रेफर केले.
                 

                    घटनेची माहिती कळताच जिंतूर पोलीस निरीक्षक दीपक शिंदे व त्याचे सहकारी यांनी तात्काळ महामार्गावर जाऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. जिंतूर येथील सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात यांनी सहकार्य केले.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.