जिल्हापरिषद अध्यक्ष पद न भेटने हीच नाना साहेब राऊत यांची पोटदुखी–प्रसाद बुधवंत

जिंतुर(अजमत पठाण)-
नानासाहेब राऊत यांना जि.प.अध्यक्ष पद न भेटने हीच त्यांची खरी पोट दुःखी असल्याचा आरोप आज राष्ट्रवादी कॉंग्रेस विधान सभा अध्यक्ष प्रसाद बुधवंत यांनी केला.
वास्तविक पाहता “ती”जालना येथे झालेल्या बैठकीचे सूत्रधार कोन होते याचे आत्मपरीक्षण वास्तविक पाहता नाना रावुत यांनीच करावे कारण या बैठकीत त्यांचे मेव्हने पंडितराव घोलप, ग्रा.प.सदस्य अंनतराव चौधरी हे होते. म्हणून या बैठकीचे खरे आयोजक कोन होते हा मुख्यप्रश्न आहे.मि स्वतः सदर बैठकीत नकार भूमिका स्पष्ट केली. बाहेर पडताच सर्व प्रकार विजय भांबळे यांच्या कानी टाकला सुद्धा असाही महत्वाच्या खुलासा प्रसाद बुधवंत यांनी करत वास्तविक पाहता गेल्या अडीच वर्षा पासून नाना राऊत यांनी नाराजी दाखवत पक्षा पासून अलिप्त राहण्याची भूमिका बजावत होते.
माजी आमदार विजय भांबळे यांनी आपल्या चारठाणा येथील वाढदिवसात सोबत राहून काही व्यक्तींनी गद्दारी केली अशा गद्दार व्यक्तींना त्यांना त्यांची जागा दाखवा असा उल्लेख केला होता. याच आरोपानंतर स्थानिक जि.प.सदस्य नानासाहेब राऊत यांनी माझ्या गावी येऊन माझ्यावर लावलेला हा आरोप माझ्या जिव्हारी लागला आहे आम्ही गद्दार असतो तर विधानसभेत राष्ट्रवादीला मताधिक्यच भेटले नसते असे म्हणत चारठाणा येथील एका बैठकीत प्रतिउत्तर दिले होते. याच बैठकीत नाना राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडचिठ्ठी देऊन लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी घोषणाही करून टाकली होती. या आरोप-प्रत्यारोपास राष्ट्रवादीचे जिंतूर-सेलू विधानसभाचे अध्यक्ष प्रसाद बुधवंत यांनी शासकीय विश्राम गृह येथे पत्रकार परिषद घेऊन नानासाहेब राऊत यांच्या आरोपाचे सर्व खंडन करून असे सांगितले की माजी आमदार विजय भांबळे यांनी त्यांचे कुठेही प्रत्यक्ष नाव घेतलेले नसून राजकारणात काम करत असताना विजय भांबळे यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका यादी स्वराज्य संस्थेच्या पदावर सर्व जातींना समान न्याय देण्याची भूमिका घेतली आणि नेमके हेच नाना राऊत यांना पचले नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या 24 पैकी 13 जागा या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिंकून आल्या होत्या त्यापैकी सहाजिकच अध्यक्षपदाचा मान हा जिंतूरला भेटला होता. त्यावेळी नानासाहेब राऊत यांनी ओबीसीला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण सुटल्यामुळे अविनाश काळे, मुरली मते, विठ्ठल घोगरे, बाळासाहेब घुगे, आदी सर्व या जिल्हा परिषद सदस्यांना सोबत घेऊन नानासाहेब राऊत यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची दावेदारी विजय भाबळे यांच्या कड़े केली होती. पण भांबळे त्याच वेळी स्पष्ट केले की मि आमदार नसताना सुद्धा बंजारा समाजाने मला भक्कम साथ दिली. या पूर्वी सौ.मिनाताई राऊत यांना बांधकाम आरोग्य सभापती पद दिलेले आहे. तेंव्हा पुढील दोन वर्षाने येणाऱ्या विधानसभा पाहता बंजारा समाजास न्याय देने आवश्यक म्हणून विश्वनाथ राठोड यांच्या सुविद्य पत्नी उज्वला राठोड यांना जिल्हापरिषद अध्यक्ष पद बहाल केले. आणि नेमकी हीच पोटदुखी नानासाहेब राऊत यांची झाली.असेही प्रसाद बुधवंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आणि यांच्या नैराष्येतुन नानासाहेब राऊत यांनी विजय भाबळे यांच्या वर बेलगाम आरोपा लावला असे सांगितले.
वास्तविक पाहता धनगर, वंजारी आदि समाजाचा विचार करत पुंजारे गुरुजी, माझ्या वहिनी मिना बुधवंत आदिना योग्य न्याय देण्याचे काम भाबळे यांनी केले. त्यांनी शेवटी असेही सांगितले की निवडणुकी पूर्वी मि बाहेर पडलो तर विजय भाबळे यांना सहानभूति भेटेल म्हणून यांच्यात सोबत राहुन विजय भांबळे यांना जर नाही पाडले तर मि लक्ष्मणरावची औलाद नाही.असे वेळोवेळी नानाराऊत यांनी गरळ ओकली. असाही पत्रकार परिषदेत प्रसाद बुधवंत यांनी नानाराऊत यांच्या वर गंभीर आरोप लावला आहे.
आम्ही काम करत असताना गदारी केली असती तर आमची हकालपट्टी झाली असतील- विजय भाबळे यांच्या सोबत काम करता असताना आम्ही प्रामाणिक पणा जपत कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता पक्ष वाढी साठी अहोरात्र काम करत आलो व भविष्यात सुद्धा काम करत राहु शेवटी असा खुलासा प्रसाद बुधवंत यांनी पत्रकार परिषदेत केला.
नानासाहेब राऊत यांना अध्यक्षपद नाही मिळाल्याने पोट दुखी होती…, तर ज्यांना अध्यक्षपद मिळालं त्यांचे पती यांची काय पोट दुखी होती
राहिला प्रश्न जालन्यातील बैठकीचा आयोजनाचा तर आपणच भावाची गाडी घेऊन आठ दिवस भांबळे साहेब पासून अलिप्त होतात याचं काय
नानासाहेब राऊत यांनी लक्ष्मणराव यांची औलाद असल्याचे वेळोवेळी दाखवून दिले अजून कशाला परीक्षा घेता