उत्सवजिल्हामराठवाडामहाराष्ट्र

जिंतूर शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी.

बीजेपीला रमजान ईद चा विसर पडला.

जिंतूर (अजमत पठाण):

                          गेल्या दोन वर्षांपासून कोणताही सण कोरोनामुळे नीट साजरा करता आला नव्हता, प्रत्येक सणावर मर्यादा आल्या होत्या. यंदा मात्र दिलासा मिळाला आहे.चंद्र पाहिल्यानंतर लोक नवीन कपडे घालतात आणि आपल्या प्रियजनांना भेटतात.               

भारत सहसा सौदी अरेबियाला फॉलो करतो, आपल्याकडे सौदी अरेबियाच्या एक दिवसानंतर चंद्र दिसतो. त्यामुळे काल रात्री आकाशात चंद्र दिसल्यानंतर ईद साजरी करण्यास सुरूलात झाली.

*कोरोनाच्या ब्रेकनंतर पुन्हा उत्साह*

                गेल्या दोन वर्षात जगाने कोरनाच्या तीन लाटा पाहिल्या आहेत. या तीन लाटा कधीही न विसण्यासारख्या आहेत. यात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. तर अनेकांनी आपले उद्योगधंदे देशोधडीला लागताना पाहिले आहेत. आता पुन्हा थोडी मोकळीक मिळू लागल्याने छोट्या व्यापाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पुन्हा उद्योगधंदे पूर्वपदावर येऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा ईद दणक्यात साजरी करण्यात आली .

जिंतूर शहरात रमजान ईद उत्साहात साजरी झाली. सुमारे १० हजार पेक्षा अधिक मुस्लिम बांधवानी एकत्रित नमाज पठण केले. गळा भेट घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सुलेमानी व शमशुद्दीन ईदगाह याठिकाणी एकत्रित नमाज पठणचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव सुरेश नागरे, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रेक्षा भांबळे, उपनगराध्यक्ष बाळू भांबळे, आदींनी उपस्तीत राहून ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांचे सामाजिक प्रश्न सोडविण्याचे आश्वासन यावेळी उपस्तीत लोकप्रतिनिधींनी दिले.

                मुस्लिम बांधवांनी एकत्रित नमाज पठण करण्यात आले. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवानी एकमेकांची गळा भेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. सायंकाळी शिरखुरमा पार्ट्या रंगल्या होत्या. नातेवाईक, मित्र यांनी मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन शिरखुरम्याचा आनंद लुटला. ईद साठी झालेली गर्दी लक्षात घेता पोलीसांनीही कडक बंदोबस्त ठेवला होता.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ईदगाह येथे उपस्थित राहून मुस्लिम समाजाला दिले रमजान ईदच्याशुभेच्छा तर बीजेपीला रमजान ईद चा विसर पडला. एकही बीजेपी कार्यकर्ता पदाधिकारी शुभेच्छा देताना न दिसल्याने समाजात चर्चेला उधाण आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.