जिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रराजकीय

भाजप परभणी जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रदिप कोकडवार यांची निवड.

माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या उपस्थितीत दिली जबाबदारी

जिंतूर (अजमत पठाण):-

परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष पदी जिंतूर येथील जुने जेष्ठ भाजप कार्यकर्ते प्रदिप कोकडवार यांची निवड आज बूथ प्रमुख व शक्तिकेंद्र प्रमुख यांच्या बैठकीत करण्यात आल्याची घोषणा भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी केली.

परभणी जिल्हा भारतीय जनतापार्टी ग्रामीणच्या उपाध्यक्ष पदासाठी जिंतूर शहरातील जुने जेष्ठ भाजप कार्यकर्ते प्रदिप सोपानराव कोकडवार यांची निवड केल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम यांचे निवड पत्र आज जिंतूर तालुक्यातील बूथ व शक्तिकेंद्र प्रमुख यांच्या महत्वपूर्ण बैठकीत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते पत्र देऊन केली आहे तालुक्यातील भाजप च संघटन मजबूत करण्यासाठी जबादारी देण्यात आली आहे असे रामप्रसाद बोर्डीकर यांनी आपल्या मार्गदर्शन प्रसंगी व्यक्त केली.
          या वेळी भाजप युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश दादा भुमरे, जिल्हा चिटणीस प्रमोद कराड, ता.अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, युवा मोर्चा ता.अध्यक्ष किशोर जाधव, शहर अध्यक्ष दत्तात्रय कटारे, महिला अध्यक्षा सुमनताई बार्शीकर, ता. संघटन सरचिटणीस मनोहर सातपुते, अनुजाती-जमाती ता. अध्यक्ष गुनिरत्न वाकोडे,प्रसिद्धी प्रमुख सचिन रायपत्रीवार यांच्या सह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.