भाजप जिंतूर तालुका प्रसिद्ध प्रमुख पदी सचिन रायपत्रीवार यांची निवड.
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या उपस्थितीत दिली जबाबदारी

जिंतूर(अजमत पठाण):-
भारतीय जनता पार्टी प्रसिद्ध प्रमुख पदी सचिन रायपत्रीवार यांची निवड आज बूथ प्रमुख व शक्तिकेंद्र प्रमुख यांच्या बैठकीत करण्यात आल्याची घोषणा भाजप कार्यकारिणी सदस्य व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व तालुका अध्यक्ष लक्ष्मण बुधावंत यांनी केली, सचिन मधुकरराव रायपत्रीवार यांची निवड केल्याचे तालुका अध्यक्ष यांनी निवड पत्र देऊन त्यांना सत्कार करण्यात आला. आज जिंतूर तालुक्यातील बूथ व शक्तिकेंद्र प्रमुख यांच्या महत्वपूर्ण बैठकीत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते पत्र देऊन केली आहे तालुक्यातील भाजप च संघटन मजबूत करण्यासाठी जबादारी देण्यात आली आहे असे रामप्रसाद बोर्डीकर यांनी आपल्या मार्गदर्शन प्रसंगी व्यक्त केली.
या वेळी भाजप युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, नवनिर्वाचित उपाध्यक्ष प्रदीप कोकडवार, अनु जाती जमातीचे ता अध्यक्ष गुनिरत्न वाकोडे, जिल्हा चिटणीस प्रमोद कराड, ता अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, युवा मोर्चा ता अध्यक्ष किशोर जाधव, शहर अध्यक्ष दत्तात्रय, कटारे, महिला अध्यक्षा सुमनताई बार्शीकर, ता संघटन सरचिटणीस मनोहर सातपुते, महिला बांडेताई, यांच्या सह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.