क्रीडा व मनोरंजनजिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

जिंतुरचा क्रिकेट संघ राज्यपातळीवर खेळण्यास रवाना.

जिंतुर(अजमत पठाण):-

जिंतूर येथील मोहसीन पठाण क्रिकेट क्लब  बेंगलोर,तेलंगणा व महाराष्ट्र या राज्यां मध्ये खेळल्या जाणाऱ्या भारतरत्न राजीव गांधी राष्ट्रीय T20 क्रिकेट स्पर्धेसाठी श्री सुरेश भैय्या नागरे यांच्या मार्गदर्शनात हैदराबाद येथे रवाना झाले असुन या वेळी स्वागत व अभिनंदन सुरेश नागरे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले.

आज रविवारराेजी मोहसीन पठाण क्रिकेट क्लब हा संघ बेंगलोर, तेलंगणा व महाराष्ट्र या राज्यां मध्ये खेळल्या जाणाऱ्या भारतरत्न राजीव गांधी राष्ट्रीय T20 स्पर्धेसाठी हैदराबाद येथे जात असून सुरेश भैय्या नागरे यांच्या निवासस्थानी मोहसीन पठाण क्रिकेट क्लब यांनी संघाच्या सर्व खेळाडूंचे स्वागत केले.

           सर्व खेळाडूंच्या येणेजाणेची सर्व व्यवस्था सुरेश भैय्या नागरे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आली.या प्रसंगी बोलताना श्री सुरेश भैय्या नागरे यांनी युवकांनी विविध क्रीडा प्रकारात आपले प्राविण्य सिद्ध करावे व त्यासाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा व ईतर सर्व मदत करणार असल्याचे सांगून त्या सर्व खेळाडूंचे मनोबल वाढविले व यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मोहसीन क्रिकेट क्लब संघाचे निखिल वैष्णव,मुज्जू खान,समीर पठाण, गुड्डू भाई, शाहरुख शेख,सुनील जाधव, अझहर हाजी,सय्यद जाहेद, सोहेल खान,सुधाकर,इम्रान खान, जावेद शेख,तन्वीर,यासह डॉ निशांत मुंडे,मोहसीन पठाण, पप्पू टाकरस,रावसाहेब खंदारे, जाबेर मुल्ला,अदी मान्यवर उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.