क्राईमजिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

जिंतूरात ९ लाखांच्या जिलेटीनच्या कांड्या, डिटोनेटर जप्त. तिघांवर गुन्हा दाखल

तिघांवर गुन्हा दाखल

जिंतूर(अजमत पठाण):-
जिंतूर-मंठा रोडवरील डोनवाडा शिवारात दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी १९ मे रोजी ९ लाख ६ हजार ४८ रूपयांच्या २२८ जिलेटीन कांड्या व १०८ डिटोनेटर तसेच ब्लास्टींगचे २ टॅक्टर, २ कॉम्प्रेसर मशीन जप्त केल्या.

जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मिना यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जिंतूर- मंठा रोडवरील डोनवाडा शिवारात घातक अशा जिलेटिनच्या कांड्या व डिटोनेटर असल्याची माहिती दशहतवाद विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक दिलीप दंतुलवार, अकबर पठाण, भारत नलावडे, अझर पटेल, सुनिल राठोड, सय्यद जाकेर, आरेफ कुरेशी, जावेद खान, सुधिर काळे यांच्या पथकाने छोपा टाकला असता या ठिकाणी २२८ जिलेटीनच्या कांड्या, १०८ डिटोनेटर, ब्लास्टींगचे २ टॅक्टर, २ कंम्प्रेसर मशीन असा एकुण ९ लाख ६ हजार ४८ रूपयांचा ऐवज मिळून आला.

                              या प्रकरणी राजेश आत्माराम दोंड, दिलीप प्रभु पदराम दोघे रा. अंबरवाडी ता. जिंतूर यांना अटक करण्यात आली. दरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीवरून हा सर्व माल मदन घुले यांचा असल्याची माहिती दिली. यावरून पोलिस कर्मचारी भारत नलावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिंतूर पोलिस ठाण्यात कलम ५ (ब), ६ स्टोटक पदार्थ अधिनीयम १९०८ व मोटार वाहन अधिनियम ३९(१)/१९२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेचा अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक कदम करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.