कृषीवार्ताजिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

पेरणी पुर्व योग्य नियोजनाने पिक उत्पादनात वाढ शक्य -कृषी अधिकारी काळे

जिंतूर(अजमत पठाण):-

खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी बांधव शेतीची मशागत करत आहेत. आज दि.19.05.2022 रोजी मौजे इटोली येथे तालुका कृषि अधिकारी जिंतूर कार्यालयाच्या वतीने खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण घेऊन पेरणीपुर्व योग्य नियोजन करणे बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पेरणीपुर्व शेतकऱ्यांनी योग्य नियोजन केल्यास उत्पादनात हमखास वाढ शक्य असल्या बाबत तालुका कृषि अधिकारी जिंतूर श्री एस.पी.काळे यांनी मत मांडले.

सोयाबीन पेरणी करणे अगोदर बियाणेची उगवण शक्ती तपासूनच पेरणी करावी. (70% बियाणे उगवल्यास पेरणीसाठी योग्य )
– पेरणीवेळी बियाण्यास रासायनिक व जैविक बुरशी नाशके व जैविक खतांची(पीएसबी, रायझोबीयम)बीज प्रकिया करूनच पेरणी करावी.
– माती तपासणीनुसारच गंधकयुक्त खतांची मात्रा पेरणीवेळीच द्यावी.
– जमिनीचा पोत राखन्यासाठी शेंद्रीय खतांचा पुरेपूर वापर करावा.शेणखत/कंपोस्टखत या पैकी कोरडवाहू जमिनीसाठी हेक्टरी पाच टन व बागायती जमिनीसाठी हेक्टरी दहा टन शेंद्रीय खतांचा वापर करावा.

– सोयाबीन पेरणी सरीवरंबा(बीबीएफ )पद्धतीनेच करावी असे केल्यास हमखास 25 ते 30 टक्के उत्पादनात वाढ होते शिवाय अंतर मशागत करण्यास सोपे होते.
– सोयाबीन पेरणी करतांना उताराला आडवी पेरणी करावी जेणेकरून मुल स्थळी जलसंधारण होऊन पिकास जास्त दिवस ओलावा मिळतो व मातीची धूप थांबण्यास मदत होते.
– फवारणीसाठी लिंबोळीअर्क /दशपर्णीअर्क या नैसर्गिक औषधांचा सुरवातीला वापर न चुकता करावा व एकरी 25 ते 30 इंग्रजी ‘T’ आकाराचे पक्षी थांबे लावावेत.

वरील प्रमाणे योग्य नियोजन केल्यास खर्चात बचत होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.या प्रसंगी इटोली येथील गोशाळा संचालक परमेश्वर स्वामी यांनी गोकृपा अमृत या शेंद्रीय खताबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.या वेळी गावातील प्रगतशील शेतकरी श्री जगदिशरराव घुगे,सुभाषराव घुगे,हरिहर शिंदे, बाळूअप्पा तडकसे उपस्थित होते.

           कार्यक्रम यशस्वी करणेसाठी कृषि सहाय्यक पोव्हने व परमेश्वर स्वामी सर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.