क्राईमजिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

तहसीलदारांच्या आदेशाला चारठाना मंडळ अधिकाऱ्यांकडून केराची टोपली.

गौण खनिज प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.

जिंतूर (अजमत पठाण):-

जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथील दगड खदान व क्रेशर अवैद्यरित्या चालू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी धाड टाकून त्यास सिल मारले होते परंतु संबंधित क्रेशर चालकाने परस्पर सिल तोडून साहित्य नाहीसे केल्याचे उघड झाले होते यावेळी तहसीलदार यांनी पंचनामा करून अव्वल कारकून यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते मात्र त्यांना गुन्हा दाखल करण्याचे अधिकार नसल्याने पुन्हा 1 फेब्रुवारी रोजी तहसीलदारांनी मंडळ अधिकारी चारठाना यांना गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत मात्र संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनी मागील पाच महिन्यांपासून गुन्हा नोंद न करताच तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर अधिक माहिती अशी की,तालुक्यातील मालेगाव येथील गट न 71 व 53 मध्ये दगड खदान व क्रेशर अविद्यरित्या चालू असल्याची तक्रार मालेगाव येथील रहिवासी किशन आढे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती यावरून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी धाड टाकून अवैद्यरीत्या चालणारे क्रेशर दिनांक 11 मे 2017 रोजी सिल केले परंतु संबंधित क्रेशर चालकाने सिल तोडून साहित्य नाहीसे केले असल्याचा प्रकार उघडकीस आला होता म्हणून तहसीलदारांनी 30 जुलै 2020 रोजी आदेश काढून गुन्हा दाखल करण्याचे सूचित करण्यात आले होते परंतु अव्वल कारकुनाला गुन्हा दाखल करण्याचे अधिकार नसल्यामुळे संबंधित अव्वल कारकुनाने गुन्हा दाखल केला नसल्यामुळे पुनःच चारठाना मंडळ अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश काढले परंतु तब्बल पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही संबंधित मंडळ अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला नसून तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे दिसून येत आहे यामुळे मंडळ अधिकारी आपल्या वरिष्ठांच्या आदेशाला जुमानत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाचे काय होत असेल कल्पनाच केलेली बरी म्हणून असल्या मुजोर मंडळ अधिकाऱ्यावर कार्यवाही करायला पाहिजे अशी मागणी तक्रारदार करत आहे

संबंधित प्रकरणात जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल दाखल केलेला आहे त्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे  -सखाराम मांडवगडे                 हसीलदार जिंतूर

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.