क्राईमजिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र
Trending

अखेर “त्या” व्यापाऱ्यास दीड वर्षा नंतर अटक

तालुक्यातील शेतकरी फसवणूक प्रकरण

जिंतूर( अजमत पठाण):-

जिंतूर तालुक्यातील शेवडी येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करून पैसे न देताच पोबारा केला होता हे प्रकरण उघडकीस आणल्यामुळे चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल होऊन जवळपास दिड वर्षाच्या कालावधी नंतर मुख्य आरोपी व्यापाऱ्यास पुणे येथे पकडण्यात पोलिसांना यश आले असून दिनांक 23 जून रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या व्यापाऱ्यांनी अनेक शेतकरी व व्यापाऱ्यांना सुध्दा फसवणूक केलेली आहे याचाही तपास करण्याची या वेळी गरज आहे.

तालुक्यातील शेतकरी मागील पाच वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटाकुळीस आलेला आहे यामध्ये जेमतेम उत्पादन झालेल्या शेतमालावर व्यापाऱ्यांनी डल्ला मारल्याचे उघड झाले होते असाच प्रकार येलदरी येथील व्यापारी अमोल एकसिंगे यांनी शेवडी येथील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन लाखो रुपयांचे सोयाबीन खरेदी केले होते परंतु खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे न देताच व्यापाऱ्यांनी पोबारा केला होता यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली होती मात्र तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी गुन्हा दाखल केला नव्हता म्हणून आडात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यास लाखोंचा गंडा” या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले हाेते यामुळे प्रकरण उजेडात आले होते दरम्यान शेवडी येथील बालाजी आश्रोबा घुगे यांच्या फिर्यादीवरून अमोल अप्पा एकसिंगे, बाळू अप्पा एकसिंगे, विलास राठोड, विनोद वाव्हळे यांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी फरार होते याबाबत पोलिसांना त्यांचा सुगावा लागलेला नव्हता दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी इतर आरोपींना पकडण्यात आले होते मात्र मुख्य आरोपी अमोल अप्पा एकसिंगे यांचा सुगावा लागत नव्हता परंतु तपास अधिकारी फाैजदार टी. इ. कोरके यांना गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपी पुणे येथे असल्याची माहिती मिळाली होती त्या आधारे कार्यवाही करून अटक केली यावेळी त्यांच्यासोबत पो.ना.अरविंद धबडे, पो. कॉ. माधव गोरे हे सोबत होते.

          आज मुख्य आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या व्यापाऱ्यांनी अनेक शेतकरी व्यापाऱ्यांना गंडा घालून फसवणूक केली आहे याबाबत पोलिसांचा तपास करणे गरजेचा असल्याचे चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.