आरोग्य व शिक्षणजिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

जिंतूर येथे जागतिक ‘योग दिन’ उत्साहात साजरा.

जिंतूर (अजमत पठाण):-

जिंतूर शहरातील माऊली मंगल कार्यालयात आज दि.२१ जुन रोजी सकाळी ७ वा . ८ वा जागतिक योग दिन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व आरोग्यवर्धनी योगशिक्षक संघ यांच्या वतीने यशस्वीरीत्या साजरा करण्यात आला.

यावेळी तालुका समन्वयक व योग शिक्षक डॉ. शिवप्रसाद सानप यांनी प्रोटोकॉल प्रमाणे प्रार्थना , सूक्ष्म व्यायाम , आसने , प्राणायाम , शांतीपाठ द्वारे उत्तम प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले यावेळी मंचावर योगशिक्षक सचिन रायपत्रिवार , बाळासाहेब रामपूरकर सोबत उपस्थित होते .

जिंतूर तालुक्यातील सर्व ठिकाणी जागतिक योग दिन साजरा करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . राहुल गिते , जिल्हा आयुष अधिकारी डॉ वडमिलवार यांचे विशेष मार्गदर्शन व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश बोराळकर यांचे सहकार्य लाभले .या योग दिनात आरोग्य अधिकारी , समुदाय आरोग्य अधिकारी , कर्मचारी, आरोग्यवर्धनीचे योग शिक्षक ,नगरपरिषद कर्मचारी, व्यापारी वर्ग आणि मिडिया पत्रकार प्रदीप कोकडवार, भागवत चव्हाण, संदिप माहुरकर, शहजाद पठाण,राम रेघाटे, व इतर योग साधक बांधव व भगिनींनी सहभाग नोंदवला. श्रेया व सानवी प्रशांत घिके या बहिणींनी प्रत्येक्षके केली.

             हा योग दिन यशस्वी करण्यासाठी दिलीप राठोड, श्रीमती एस पी सिडाम, दत्तात्रेय कोटकर, विजयकुमार ढगे, स्वामी देशमुख, श्रीमती शीला भुते, व आरोग्य वर्धनी योगशिक्षक संघातील सर्व योग शिक्षक यांनी अनमोल सहकार्य केले .

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.