आरोग्य व शिक्षणजिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रशैक्षणिकसत्कारमूर्ती

विलासराव देशमुख उर्दु माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जिंतूर येथील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न.

पालकांकडून शिक्षकांचे सत्कार करण्यात आले.

जिंतूर (अजमत पठाण):-

            जिंतूर शहरातील विलासराव देशमुख उर्दु माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मधील मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत शाळेचा एकूण निकाल ९९.११ टक्के लागला असून शाळेने यशाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेतून ज्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून यश संपादन केले त्या विद्यार्थ्यांचे शाळेतर्फे आज सत्कार करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मा. आसेफोद्दिन सिद्दिकी साहेब होते तर कार्यक्रमाची सुरुवात दहावीच्या विद्यार्थीनी राबिया शारेक बेग त्यांच्या कुराण पठणाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणात संस्थाध्यक्ष आसेफोद्दिन सिद्दिकी साहेब यांनी विशेष प्राविण्य श्रेणीत आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद शब्द सुमनाने अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर शाळेतून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या 26 विद्यार्थ्यांपैकी शाळेतून प्रथम क्रमांक सना नवाज उर रहमान कुरेशी (९१.६०%), दुतीय आलिया शेख इम्रान लाडले (८९.८०) तर तृतीय क्रमांक अंशीरा मिर्झा साद बेग(८९.००%) आणी उजमा हफिजोद्दिन सिद्दिकी (९०.००%) यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शाळेतर्फे त्यांचे व पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विशेष बाब म्हणजे पालकांकडून सर्व शिक्षकांचे उत्तम कामगिरी केल्याबद्दल हार घालून स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख मेराजोद्दीन सिद्दिकी सर यांनी तर आभारप्रदर्शन अहमद सिद्दिकी सर यांनी केले यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.