जोगवाडा व राजेगाव येथे भारतीय युवक काँग्रेस शाखेचे अनावरण.

जिंतूर (अजमत पठाण):-
जिंतूर तालुक्यातील जोगवाडा व राजेगाव येथे भारतीय युवक काँग्रेस शाखेचे अनावरण आज दि. 28 जुन रोज मंगळवार रोजी भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव सुरेश भैय्या नागरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या बाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथुन जवळच असलेल्या जोगवाडा व राजेगाव येथे भारतीय युवक काँग्रेस शाखांचे अनावरण भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव सुरेश भैय्या नागरे यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्हा भारतीय काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, जिल्हा सचिव प्रदिप देशमुख, बोरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र नागरे, मागासवर्गीय सरचिटणीस नागसेन भेरजे, युवक विधानसभा अध्यक्ष राम घुगे, रामभाऊ तिर्थे, पोले, विष्णू मस्के, डाॅ निशांत मुंडे, मा.उपसरपंच तहेसिन देशमुख, ग्राम पंचायत सदस्य नानासाहेब निकाळजे, पत्रकार प्रभाकर कुर्हे ,छत्रपती शिंदे आदी उपस्थित होते जोगवाडा येथे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाध्यक्ष अनिल सुरवसे, उपाध्यक्ष सुरेश सुरवसे, सचिव दिनकर मस्के, कार्याध्यक्ष कैलास मस्के, सल्लागार डि. पी. खंदारे, कैलास सुरवसे, सदस्य सुभाष सुरवसे, रवि सुरवसे, विलास मकरासे, प्रकाश सुरवसे, प्रकाश खाडे आदिंनी परिश्रम घेतले.
या वेळी 25 ते 30 जनांनी सुरेश नागरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर राजेगाव येथे शाखाध्यक्ष गौतम तुपसुंदर, उपाध्यक्ष सुखदेव तुपसुंदर, दिपक तुपसुंदर, पुण्यवर्धन तुपसुंदर, प्रल्हाद तुपसुंदर, शिवाजी तुपसुंदर यादींसह अनेक तरुणांनी परिश्रम घेतले.