लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी तर्फे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

जिंतूर (अजमत पठाण) :-
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष प्रेक्षाताई भांबळे यांनी जिंतूर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
‘महापुरुषांच्या कार्याचे उत्सव होत राहिल्यानेच गाव कुसाबाहेर राहणाऱ्या समाजापर्यंत विचार पोहोचले. दोन पिढ्या या विचारांनी प्रेरित होऊन प्रगतीची वाट चालू लागल्या. सुशिक्षितांचे प्रमाण अण्णाभाऊ साठे यांच्या सारख्या महापुरुषांच्या विचारांच्या प्रबोधनामुळे वाढले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे तरुणांनी मंथन करावे आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गाने देशसेवा करावी,’असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवती परभणी जिल्हाध्यक्ष प्रेक्षाताई भांबळे यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदचे समाजकल्याण सभापती रामराव उबाळे, नगरसेवक उस्मान पठाण, मनोहर डोईफोडे, शाहेद बेग मिरझा, दत्तराव काळे, चंद्रकांत बहिरट, संजय उर्फ बंटी निकाळजे ,अहमद बागमान, शेख इस्माईल, मकसूद पठाण, महिला तालुकाध्यक्ष मनिषाताई केंद्रे आशाताई खिल्लारे, हरभरे ताई, अनिल मोहिते इत्यादी उपस्थित होते.