जिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयमराठवाडामहाराष्ट्र

उधार वर्दी देऊन महामार्ग पोलिसांची वाहनचालकाकडून लूट ?

जिंतूर (अजमत पठाण) :-

         जिंतूर तालुक्यात दोन्ही महामार्ग चेक पोस्टवर अनाधिकृत खाजगी मानसे लावून परराज्यातून येणारे ट्रक व जिप, टूर वाहन चालकाकडून सर्रास व बिनधास्त पणे वसुली केली जात असल्याची तक्रार महामार्ग पोलीस अधीक्षक औरंगाबाद यांना देऊन हे सर्व प्रकार तात्काळ बंद न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा नियाज खान गफूर खान पठाण यांनी निवेदनात दिला आहे.

देवगाव फाटा महामार्ग पोलीस चौकीवर खाजगी व्यक्ती वाहन चालकाकडून आम्हीच महामार्ग पोलीस असल्याची बतावणी करून अव्वाच्या सव्वा वसुली करत अनाधिकृतपणे खाजगी माणसे लावून चालते अशाच प्रकारची जिंतूर औंढा रोडवर ही खाजगी व्यक्तीमार्फत वसुली सुरू असल्याची मोहीम राबवली जात आहे.

             या ठिकाणी सदरील चौकीवर एकापेक्षा जास्त खाजगी व्यक्तीची नेमणूक महिनेवारी करण्यात आली असून सदरील व्यक्ती वाहनधारकांकडून आडून वसुली करण्याचे काम सुरू आहे व तेही खऱ्या कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने वसुली चालू असते. त्यामुळे परराज्यातून येणाऱ्या वाहनधारकांना त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार तात्काळ थांबवावा. अशी मागणी नियाज खान गफूर खान पठाण यांनी निवेदनात केली आहे.

   सांकेतिक स्टॅम्प चा वापर ! 

        सदरील वाहन चौकी पास केल्या बद्दल छोट्या डायरीवर सांकेतिक स्टॅम्प मारून त्या वाहनास पुढील चौकीवर सोडण्याचा ईशारा दीला जातो.

हा सर्व प्रकार तात्काळ न थांबल्यास दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी महामार्ग पोलीस अधीक्षक, औरंगाबाद यांचे कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा तक्रारकर्त्यांनी दिला असून त्यांचे प्रती, मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. पोलीस संचालक मुंबई, मा. अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक विभाग) मुंबई, व मा. पोलीस अधीक्षक परभणी. यांना माहितीस्तव व योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याची तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.