ग्रामीण वार्ताजिल्हाताज्या घडामोडीपावसाळामराठवाडामहाराष्ट्र

जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे मुसळधार पावसाने गोद्री नदीला पुर.

जिंतूर/ चारठाणा (अजमत पठाण) :-

             जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे आज गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या मुसळधार पाऊसामुळे गोद्री नदीला मोठया प्रमाणावर पूर आला होता. परिणामी कसबा व पेठ विभागाचा जवळपास दोन तास संपर्क तुटल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे गुरूवारी दुपारी पावने तिनच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरूवात झाली. जवळपास एक तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी वाहू लागले. तसेच गावातील काही रस्त्यावरुन सुमारे एक ते दिड फुट पाणी वाहू लागल्याने या रस्त्यांना छोट्या तळ्यांचे स्वरुप आले होते. दरम्यान काही वेळातच साडेतीनच्या सुमारास चारठाणा गावाच्या मध्यभागी असलेल्या गोद्री नदीला मोठया प्रमाणावर पाणी आले होते. या पुराचे पाणी कमी उंचीच्या पुलावरुन वाहात असल्याने कसबा व पेठ या दोन विभागाचा सुमारे दोन तास संपर्क तुटला होता.

            सायंकाळी उशीरापर्यंत या पुलावरून पाणी वाहत होते. दोन्ही बाजूने पुलावरुन जाणार्‍या लोकांची एकच तारांबळ उडाली होती. त्यामुळे अनेक शाळकरी विद्यार्थी व नागरीक अडकून पडले होते. तसेच हा रस्ता बंद झाल्याने बायपासवरील चारठाणा – कावी रस्त्यावरुन काही जणांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या पुलावरून देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने वाहातूक बंद होती. तसेच पावसामुळे शेतातील कामे बंद पडल्याने शेतातुन परतणार्‍या शेतकर्‍यांची व शेतमजुरांची सुध्दा एकच तारांबड उडाली होती. अनेकांना पुराचे पाणी कमी होईपर्यंत जवळपास दोन तास अडकून पडावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.