उत्सवजिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयमराठवाडामहाराष्ट्र

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिंतूर शहरात भव्य सायकल रॅली.

भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी शहर दणाणले.

जिंतूर (अजमत पठाण) :-

          स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिंतूर शहरात तहसील कार्यालय, नगरपालिका जिंतूर व शहरातील सर्व विद्यालय यांच्यावतीने आज दि. ५ वार शुक्रवार रोजी सकाळी ८:३० वा. भव्य सायकलीचे आयोजन करून शहरातील जवाहर विद्यालय येथून जिंतूर-सेलू मतदार संघाच्या आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. 

 ही सायकल जिंतूर शहरातील जव्हार विद्यालय येथून सोडण्यात आली. सायकल रॅली चा रूट जव्हार विद्यालय – नरसिंह चौक – टिपू सुलतान चौक – नेवती मोहल्ला – शहरातील मुख्य चौक – पोलीस स्टेशन समोरून – छत्रपती शिवाजी महाराज चौक – जिंतूर तहसील कार्यालय समोरून – अण्णाभाऊ साठे पुतळा – शिवाजीनगर मधून – ज्ञानेश्वरी विद्यालय मध्ये समारोप झाला. या सायकल रॅलीमध्ये शहरातील जव्हार विद्यालय, ज्ञानेश्वरी विद्यालय, जव्हार प्राथमिक विद्यालय, श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर कन्या विद्यालय, त्याचबरोबर एकलव्य बाल विद्यामंदिर, कै.शंकररावजी चव्हाण विद्यालय सह आदी शाळांनी सहभाग नोंदवला. 

या सायकल रॅलीस आमदार मेघना बोर्डीकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. 

मी यावेळी आमदार मेघना बोर्डीकर, जिंतूर पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार, नायब तहसीलदार ओम प्रकाश गोंड, नगरपालिकेचे साहेल चाऊस, जवाहर विद्यालयाचे वटाणे सर, मते सर, ज्ञानेश्वर विद्यालयचे मुख्याध्यापक वाघ सर, नगरपालिकेचे कर्मचारी, तलाठी आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.