जिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रराजकीय

भाजपच्या कार्यकाळात वाढलेल्या महागाई, बेरोजगारी, जी.एस.टी.व अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे आंदोलन….

ओला दुष्काळ जाहीर करुन अतिवृष्टीबाधितांंना तातडीने मदतीची मागणी.

जिंतूर ( अजमत पठाण) :-

          अतिवृष्टीमुळे विदर्भ, मराठवाड्यातील शेतकर्‍यांंचे व नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी केली आहे. जिंतूर-सेलु तालुक्यातील शेतकर्‍यांच्या व शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई व पिकविमा लागू करण्याबाबत योग्य ती माहिती संकलीत करावी तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी 75 हजार रुपयांंची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिंतूर ता. कॉग्रेस कमिटीने केली आहे. या मागणीसाठी आज शुक्रवारी (दि.5) काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेश भैय्या नागरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी व आंदोलन करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेती पिकांंचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती पुर्णत: खरडून गेली आहे. तर कित्येक शेतांमध्ये नदी-नाल्यांचा गाळ साचल्याने ती खराब झाली आहे. यामुळे या शेतीवर भविष्यात कोणताही पिके घेता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आधीच दुबार-तिबार पेरणीने डबघाईस आलेला शेतकरी या अतिवृष्टीमुळे पुर्णत: कोलमडून पडला आहे. अशावेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे काँग्रेस उभी आहे. प्रांताध्यक्ष व अतिवृष्टी पाहणी समितीच्या भेटीदरम्यान शेतकर्‍यांना तात्काळ सरकारी मदत मिळावी अशी मागणी केली आहे. मात्र राज्यात केवळ दोन मंत्र्यांचे सरकार असल्याने शेतकर्‍यांकडे त्यांचे लक्ष नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेता कांग्रेस आंंदोलन करून या दोन मंत्र्यांच्या सरकारचा जाहीर निषेध केला आहे.

या वर्षीचे पीक कर्ज माफ करावे. फळ बागायतदारांना भरीव मदत द्यावी. खरडून गेलेल्या व गाळ साचलेल्या शेतजमिनीच्या दुरुस्तीसाठी ठोस मदत मिळावी या मागण्या निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या आहेत.

यावेळी सदर निवेदनावर माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख, तालुका अध्यक्ष गणेशराव काजळे, राजेंद्र नागरे, केशवराव बुधवंत, नागसेन भेर्जे, डॉक्टर निशांत मुंढे, मोहसिन खान, प्रदीप देशमुख, रेहमान भाई, इर्शाद पाशा चांद पाशा, रामजी घुगे, माऊली नागरे, कृष्णा टाकरस, महेश सांगळे, तेहसिन देशमुख, कृष्णा राऊत, रामप्रसाद माघाडे, बाळू फाटे, बाबुराज, संतोष आंधळे, अनिल शेंद्रे, निलेश घुगे, जम्मू भाई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.