अमृत महोत्सवजिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयमराठवाडामहाराष्ट्र

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान “सेल्फी विथ तिरंगा” अभियान.

परभणी/प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परभणी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्यामार्फत दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत “सेल्फी विथ तिरंगा” अभियान राबवीण्यात येणार असून अभियानाच्या कालवधीत परभणी जिल्ह्याचा संकेतस्थळावर “सेल्फी विथ तिरंगा” या शिर्षकाखाली www.parbhani.gov.in/selfiewithtiranga/ आपले छायाचित्र अपलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सहभागींपैकी निवडक छायाचित्रे परभणी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून लकी ड्रॉ मार्फत त्यापैकी निवडक नागरिकांचा जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तसेच भारत सरकार तर्फे चालविण्यात येत असलेल्या “हर घर तिरंगा” या अभियानाअंतर्गत https://harghartiranga.com ) या संकेतस्थळावर “सेल्फी विथ तिरंगा” या शिर्षकाखाली उपलब्ध असलेल्या लिंकवर जावून आपले छायाचित्र अपलोड करावे. जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी यामध्ये सहभाग घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.