अमृत महोत्सवजिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

जिंतूर मुस्लिम युवकांची ऐतिहासिक भव्य दुचाकी तिरंगा रॅली.

जिंतूर (अजमत पठाण):-

                             जिंतूर शहरातील ऑल मुस्लिम युथ तर्फे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्त हजारो मुस्लिम युवकाच्या उपस्थितीत शहरातील मुख्य रस्त्यावर भव्य दिव्य ऐतिहासिक मोटरसायकल रॅली काढण्यात आली आहे.

रॅलीची सुरूवात येेदरी रोडवरील टिपू सुल्तान चौक येथून हजारो दुचाकीस्वारांनी हातात तिरंगा घेत जोरदार घोषणा देत रॅॅली ची सुरुवात करण्यात आली. रॅली काढण्या पुर्वी टिपू सुल्तान चौक येथे एक छोटासा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात मौलाना अब्दुल माबूद यांच्या कूरआन पठनाने करण्यात आली. प्रास्ताविक भाषणात अहेमद सिद्दिकी यांनी सर्वांसमोर सदरील रॅली काढण्याचे उद्देश्य, रूपरेषा तथा मार्गाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच सर्वांना नियमांचे पालन करण्याचे व झेंडेचा पुर्णपणे आदर ठेवण्याचे आव्हान केले. सूत्रसंचालन शोएब सिद्दीकी यांनी केले

या नंतर रॅलीची सुरुवात करण्यात आली. ही रॅली टिपू सुल्तान चौक ते वरूड चौक-शिवाजी चौक-महावीर चौक- बलसा रोड- साई मंदिर- अंबेडकर चौक – अण्णाभाऊ चौक- तहसील कार्याल – बस स्टैंड- शिवाजी चौक- पोलीस स्टेशन- मेन चौक- दादा शरीफ चौक- वरूड चौक मार्ग अखेर टिपू सुल्तान चौक येथे समाप्त झाली. सामुहिक राष्ट्रगीत गायन करुन रॅलीची सांगता करण्यात आली.

रॅलीला यशस्वी करण्यासाठी अंशाल लाला, शाहेद सिद्दीकी, शेख शाहेद, सय्यद साहील, मोहसीन पठाण, सूलेमान सिद्दिकी, विखार खान,सय्यद कलीम, अमीन मेमन, सय्यद कलीम,सय्यद सलमान,यांनी विशेष परिश्रम घेतले.विशेषकरून या रॅली साठी एक पण मोठा राजकीय,धार्मिक,नेत्याचे नेतृव नसताना देखील या रॅलीत मुस्लिम युवकांनी भव्य ऐतिहासिक उल्लेखनीय असा सहभाग नोंदवल्याचे दिसून येत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.