अमृत महोत्सवजिल्हाजिल्हा परिषदताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रशैक्षणिक

जिंतूर शहरातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा शाखा क्र.२ व नुतण प्राथमिक शाळा तर्फे हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन

जिंतूर (अजमत पठाण) :-

           जिंतूर शहरातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा शाखा क्र.२ व नुतण प्राथमिक शाळा तर्फे हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करूण जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांनी प्रचंड मोठी प्रभातफेरी काढून भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.

शिक्षण विभाग यांच्या वतीने जिंतूर शहरात देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा जनजागृती साठी प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये शहरातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा शाखा क्र.२ व नुतण प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा शाखा क्र.२ व नुतण प्राथमिक शाळेतून निघालेल्या ही प्रभातफेरी शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातून फतन प्लॉट मार्गे विविध भागात ढोल ताश्याच्या वाद्यात, विद्यार्थ्यांनी हातात झेंडा घेत, हर घर झेंडा, भारत माता की जय अशा घोषणा देत प्रभातफेरी काढली. यावेळी प्रथम शिक्षकांनी जमलेल्या विद्यार्थी व नागरिकांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या अभियानाची माहिती देत मुलांसाठी शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धां विषयी माहिती दिली.

या वेळी जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा शाखा क्र. २ मुख्याध्यापीका पठाण समीना यास्मिन व नुतण प्राथमिक शाळा मुख्याध्यापक बोकण सर व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.

    कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीत गाऊन करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.