अमृत महोत्सवजिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

जिंतुर येथील जामा मस्जिद इनामी जमीन प्रकरणात टिपू सुल्तान सेना जिल्हा अध्यक्ष शेख अहेमद शेख समद व मोहम्मद एजाज यांना यश मिळाले. 

जिंतूर ( अजमत पठाण) :-

                 जिंतुर येथील जामा मस्जिद इनामी जमीन प्रकरण शेख अहेमद शेख समद (टिपु सुलतान सेना जिल्हाध्यक्ष परभणी) व मोहम्मद एजाज मो.नवाज (सामाजीक कार्यकर्ता)  यांच्या लढाईला यश आले. 

मागील दोन-तीन वर्षापासुन लोकशाही मार्गाने आंदोलन, उपोषण इत्यादी जनहितास व वक्फ मालमत्ता सर्वेक्षणास लढा लढलो व त्या लढयास जनतेतुन मोठा प्रतिसाद मिळाला व आंदोलणास, उपोषणास यश मिळुन जिंतुर व वरुड जामा मस्जीद भोगवटदार वर्ग-1 मध्ये असलेली जमीन नियमाप्रमाणे वक्फ बोर्ड मालमत्ता प्रतिबंधीत क्षेत्र वर्ग-2 मध्ये नोंद सर्वे क्र. 14, 17, 18,29,30, 110,216, 223, 224 व वरुड शिवार येथील सर्वे नं. 59, 60 या सर्व सर्वे नंबरची ची नोंद भोगवटदार वर्ग- 2 मध्ये घेण्यात आली. करिता तहसिल प्रशासन, वक्फ बोर्ड यांचे सुध्दा मोलाचे सहकार्य मिळाले. 

                       शेख अहेमद शेख समद (टिपु सुलतान सेना जिल्हाध्यक्ष परभणी),मोहम्मद एजाज मो. नवाज (सामाजीक कार्यकर्ता) यांचे आज पूर्ण शहरातून अभिनंदन करण्यात येत आहे. 

         आज 15 ऑगस्ट निमित्त टिपू सुलतान सेने तर्फे तहसीलदार सखाराम मांडागवडे साहेब, ना. तहसीलदार गावंडे साहेब, मंडळ अधिकारी बोधले साहेब, तलाठी नितीन बुडे साहेब, अभिलेख अधिकारी हिंगे, पो.नि.दंतुलवार साहेब यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.