अमृत महोत्सवजिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयमराठवाडामहाराष्ट्र

जिंतूर तहसील कार्यालयात तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.

हर घर तिरंगा अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद.

जिंतूर (अजमत पठाण) :-

जिंतूर स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त जिंतूर शहरात व तालुक्यात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा या कार्यक्रमास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वतंत्र्यांच्या अमृत महोत्सव निमित्ताने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियानांची घोषणा केली होती” हर घर तिरंगा” अभियानांच्या मूळ उद्देश देशवासी यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रध्वजाबाबत जागरूकता वाढवणे हा होय.

                यावेळी शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम तहसील कार्यालय तहसीलदार श्री सखाराम मांडवगडे यांच्या हस्ते संपन्न झाला तर संपूर्ण तालुक्यात ठिकठिकाणी उत्साह पूर्ण वातावरणात ध्वजारोहण संपन्न झाले. त्यामध्ये जिंतूर पोलीस स्टेशन येथे पो. नि. श्री दीपक दंतुलवार, नगरपरिषद येथे मुख्याअधिकारी जाधव , आरोग्य विभागात वैद्यकीय अधीक्षक चांडगे व शहरातील सर्व शाळा मध्ये उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. तर तहसील कार्यालयात शासकीय ध्वजारोहणा नंतर विविध शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा विषयी पारितोषिक तहसीलदार श्री मांडवगडे, पोलीस निरीक्षक दंतुलवार आदींच्या हस्ते देण्यात आले तर दैनिक विश्व जगत या दैनिकांचे मान्यवरांचे हस्ते विमोचन करण्यात आले.

            यावेळी मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक देशमुख, लोकप्रतिनिधी, अधिकारी ,कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, पत्रकार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.