क्राईमग्रामीण वार्ताजिल्हाजिल्हा परिषदताज्या घडामोडीपाणीपुरवठामराठवाडामहाराष्ट्र

भाजपा तालुका सरचिटणीस लक्ष्मण इलग व ठेकेदार कद्रे यांच्यावर गुन्हा दाखल. 

जलजीवन मिशन योजनेत बोगस सही शिक्क्याचा वापर करून महिला सरपंच व ग्रामसेवकांची फसवणूक केल्यास सरपंचानी दिली पोलीस स्टेशनला तक्रार. 

जिंतूर(अजमत पठाण):-

                    जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा-डोनवडा संयुक्त ग्रामपंचायत करिता राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे 44,44,499 लक्ष रुपयांचे कंत्राट मिळविण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवकांच्या बनावट स्वाक्षरी ठराव सादर करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली बलसा येथील खाजगी गुत्तेदार लक्ष्मण पिराजी ईलग व परतूर येथील शासकीय गुत्तेदार किशोर कद्रे यांच्यावर जिंतूर पोलीस ठाण्यात आजरोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी ग्राम पंचायत कार्यालय पिंप्राळा-डोनवाडा येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे ४४,४४,४९९लक्ष रुपयांच्या निविदेला  मंजुरी मिळाली होती सदर कामाची रितसर निविदा जिल्हा परिषद परभणी यांच्या मार्फत निघाली होती. त्यामध्ये किशोर विजयकुमार कद्रे पद्मनाभस डेव्हलपर्स परतूर यांना सदर काम देण्यात आले होते. परंतु १०% लोकवर्गणी सहभाग असल्याचा ग्रामपंचायतचा ठराव घेऊन जलजिवन मिशन बँकेच्या खात्यात जमा करणे आवश्यक असते त्यासाठी आरोपी लक्ष्मण पिराजी ईलग व किशोर विजयकुमार कद्रे पद्मनाभस डेव्हलपर्स परतूर यांनी ग्राम पंचायत पिंप्राळा-डोनवाडाच्या सरपंच सौ.जयश्री शिवाजी चाफे व ग्रामसेवक एस.डी.इंगळे यांना विचारात नघेता बनावट स्वाक्षरी व शिक्का वापरुन बनावट कागदपत्राच्या आधारे कार्यारंभ आदेश करून घेतल्याचा आरोप आहे. 

 त्या अनुषंगाने सरपंच जयश्री चाफे यांनी सदर बोगस कागदपत्रावर आक्षेप घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यांनतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रीतसर सखोल चौकशी केली असता सदर कंत्राटदार दोषी आढळून आले होते. त्यानंतर सरपंच जयश्री चाफे यांनी जिंतूर पोलीस स्टेशन येथे समक्ष उपस्थित राहून फिर्याद दिली असता नमूद दोन्ही आरोपी विरूद्ध “भा.द.वी. कलम 420, 467, 468, 471 व 34 कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी लक्ष्मण ईलग हे जिंतूर भाजपाचे तालुका सरचिटणीस असल्याने या प्रकरणाची तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार हे करीत आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.