जिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रराजकीय

आल्पसंख्यांक विकास निधी अंतर्गत मा.आ.विजय भांबळे यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन.

जिंतूर (अजमत पठाण) :- 

             अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रम सन २०२२ योजने अंतर्गत मौजे सावंगी (म्हा.) येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधकाम रक्कम १० लक्ष, मौजे शेक येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधकाम रक्कम १० लक्ष, मौजे माक येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधकाम रक्कम १० लक्ष ई. कामाचे उद्घाटन मा.आ.विजयराव भांबळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले

 

सदर गावामध्ये अल्पसंख्यांक समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असून तेथील नागरिकांची कब्रस्तान संरक्षण भिंत बांधकाम करून देण्याची मागणी होती त्या अनुषंगाने मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते मा.ना.श्री.अजीत दादा  व तात्कालीन आल्पसंख्यांक विकास मंत्री मा.ना.नवाब मलिक साहेबास सदर निधी पाठपुरावा करून मंजूर करून घेतला होता, सदर कामाचे उद्घाटन मा.आ.विजय भांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

           मा.आ.विजयराव भांबळे यांनी असे सांगितले कि, मी जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले असून यापुढे देखील विकास कामास कधीही कमी पडणार नाही. 

  या कार्यक्रम प्रसंगी अजय चौधरी,रामराव उबाळे, बाळासाहेब घुगे, गणेशराव ईलग, मनोज थिटे, विजय, प्रभाकर चव्हाण, रामेश्वर जावळे, नारायण शेंगुळे, अलाबाक्ष पठाण, लतीफ भाई,गुलाबराव चव्हाण,मदन चव्हाण,दत्तराव नवले,दीपक वाकळे,सुरेश वाकळे, शाहेद सिद्धिकी,शेषेराव म्हाळणर,विक्रम वलेकर, मनोज खंदारे,राजेश चव्हाण, हैदर भाई, वैजनाथ शेंगुळे,नाना देशमुख, आतिक भाई, रशीद भाई, आजीम भाई, साजिद खान, नरवाडे पाटील, दत्ता नरवाडे, ई. सह गावातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.