ग्रामीण वार्ताजिल्हाताज्या घडामोडीनिवडणूकनिवडणूक विभागमराठवाडामहाराष्ट्रराजकीय

जिंतूर तालुक्यातील ३३ ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदाचा१, सदस्य पदाचे ६ अर्ज अवैद्य

७ डिसेंबर पर्यंत अर्ज मागे घेनार येणार.

जिंतूर(अजमत पठाण ):-

                    जिंतूर तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होत आहेत. सरपंच आणि सदस्य पदासाठी आलेल्या अर्जाची छाननी दि. ५ डिसेंबर रोजी करण्यात आली असून, निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

 तालुक्यात ३३ ग्रामपंचायतीमधील ३३ सरपंच पदासह सदस्यांच्या २७९ जागा साठी सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे. त्यानुसार दि. २ डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत होती. अखेरच्या मुदतीपर्यंत ३३ ग्रामपंचायतील २७९ सदस्यांसाठी तसेच ३३ सरपंच पदाकरिता १७७ आणि सदस्यासाठी ६७० अर्ज आले होते. त्यातील सरपंच पदासाठी १७६ तर सदस्य पदासाठी ६६४ अर्ज वैद्य ठरले. सरपंच पदाची १ तर सदस्य पदाचे ६ अर्ज अवैध ठरले आहेत. तालुक्यातील बदनापूर सरपंच पदाचे १ व तालुक्यातील धोपटवाडी येथील सदस्य पदाचे १, जांब बु. सदस्य पदाचे १, वसा सदस्य पदाचे ३, तर असोला सदस्य पदाचे १ अर्ज अवैध ठरले आहेत. ७ डिसेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. दि १८ डिसेंबरला मतदान तर दि. २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.