जिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रसामाजिक

जिल्ह्यातील परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक व्यवस्थेत दोन दिवस बदल

परभणी (अजमत पठाण):-

                 परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्गावर पेडगाव येथे मुस्लिम बांधवांच्या वार्षिक इज्ते्मा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक जाम होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील मार्गात बुधवार (दि.7) पासून दोन दिवस अंशत: बदल करण्यात आला आहे.

परभणी – पाथरी या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्यावरील वाहतूक इज्तेमा कार्यक्रमादरम्या्न चालू राहिल्यास वाहतूक खोळंबण्यांची व अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने परभणी – पाथरी या महामार्गावरील वाहतूक 7 ते 8 डिसेंबर या कालावधीकरीता पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. या वाहतूक व्यवस्थेत बदल करुन सेलूकडून मानवतरोड मार्गे येणारी जड वाहने कोल्हापाटी (मानवतरोड) येथून मानवत – पोखर्णी फाटा – पाथरी – उमरी मार्गे परभणीकडे वळविण्यात आली आहे. 

तसेच गंगाखेड रोड – वसमत रोड – जिंतूर रोडवरुन येणारी वाहने पेडगाव मार्गे न जाता ती गंगाखेड रोडवरील उमरी फाटा येथून पाथरीकडे वळविण्यात आली आहे. मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ख) अन्वये हे आदेश देत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.