अपघातजिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्ररस्ते महामार्ग

परभणी शहरातील जिंतूर रोडवरील अपघात प्रकरणातील आरोपीस तीन दिवस पोलीस कोठडी.

परभणी(अजमत पठाण):- 

              आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून सहा दुचाकीस्वारांना धडक देत एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीस 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. ही घटना शहरातील जिंतूर रस्त्यावर जायकवाडीच्या कालव्यावरील पुलाजवळ घडली असून जालन्याच्या राज्य राखीव दलातील जवानास या प्रकरणी अटक करुन प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

  जालना येथे राज्य राखीव दलात कार्यरत सुरेश गणेश कांबळे याने बेजबाबदारपणे वाहन चालवून सहा दुचाकीस्वारांना धडक दिली. त्यात एक व्यक्ती जागीच मरण पावली तर तिघे गंभीर जखमी व अन्य सहाजण किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर वाहन चालक सुरेश कांबळे याने घटनास्थळावरुन पोबारा केला. परंतु, नानलपेठ पोलिसांनी त्यास रविवारी रात्री अटक केली. त्याला प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले तेव्हा न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.