जिंतूरच्या वेदांत देव्हडेची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड.
16 वर्षाखाली विजय मर्चंट आंतर राज्य क्रिकेट स्पर्धा वेदांत खेळणार.

जिंतूर (अजमत पठाण):-
जिंतूर तालुक्यातील पिपळगांव (काजळे) येथील उदयोन्मुख क्रिकेटपटू वेदांत विनोद देव्हडे याच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीमुळे बीसीसीआय अंतर्गत गुजरातमधील सुरत येथे होणाऱ्या 16 वर्षाखाली आंतरराज्य विजय मर्चंट क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात त्याची निवड करण्यात आली आहे. त्याच्या अद्वितीय यशामुळे जिंतूर तालुक्याच्या वैभवात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
जिंतूर तालुक्यातील पिपळगांव (काजळे) सारख्या लहान खेड्यात जन्मलेल्या वेदांत विनोद देव्हडे यास लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असल्याने त्याच्या आवडीला योग्य रंगमंच प्राप्त व्हावे यासाठी त्याचे वडील डॉ विनोद देव्हडे यांनी त्यास शहरातील जेविजे क्रिकेट अकॅडमीत प्रवेशित केले. काही दिवसातच त्याच्यामधील अंगभूत कौशल्याच्या बळावर त्याने जिल्हा तसेच विभागीय पातळीवर क्रिकेटच्या स्पर्धेत उत्कृष्ट खेळी करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. आणि राज्य पातळीवरील सुपर लीगच्या 3 मॅचमध्ये त्याने चक्क 260 धावा काढून एक वेगळा विक्रम रचला. त्याच्या ह्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्याची बीसीसीआय अंतर्गत गुजरातमधील सुरत येथे होणाऱ्या 16 वर्षाखाली आंतरराज्य विजय मर्चंट क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली आहे. त्याच्या ह्या अद्वितीय यशामुळे जिंतूर तालुक्याच्या वैभवात आणि नावलौकिकात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
वेदांत देव्हडेच्या महाराष्ट्रात संघात निवड झाल्याबद्दल त्याचे परभणी जिल्हा क्रिकेट असोशियशनचे अध्यक्ष संतोष बोबडे, उपाध्यक्ष शशीकांत जवळेकर सचिव सुरेश सोनी, प्राचार्य बळीराम वटाणे, प्रशिक्षक ज्ञानेश्वर जगदाडे, पराग शहाणे, रुपाली ढमढेरे, सुरेश काकडे, सुहास पावडे, शेख शाहरुख, डॉ विनोद राठोड, डॉ विनोद देव्हडे व परिसरातील असंख्य किक्रेट खेळाडू तसेच क्रिकेट प्रेमी यांनी त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.