क्राईमजिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

जिंतूर औंढा रोडवर उपविभागीय अधिकाऱ्याच्या चालकांने टँकर चालकाला मारहाण केेल्याचा टँकर चालकाचा आरोप.

टँकर चालकांने गाडी नंबर न सांगीतल्याने गाडी नेमकी कुठली याचा शोध पोलीस घेत आहे.

जिंतूर (अजमत पठाण) 

जिंतूर औंढा रोडवर टँकर चालकास उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चालकाने टँकर चालकास रस्त्यात गाडी आडवी करून टँकर चालकाला थापड बुक्क्याने मारहाण व शिवीगाळ केली असल्याचा टँकर चालकाचा आरोप.

याबाबत सविस्तर माहिती अशी की जिंतूर औंढा रोडवर चालक राजू बंडू घुगे राहणार टाकळखोपा ता. जिंतूर हा मुंबई येथून टँकर घेऊन (MH 03- CV.9402)   तेलंगणात जात असताना 7 जानेवारी रोजी संध्याकाळी जिंतूर औंढा रोडवरील लिंबाळा ते आडगाव फाटा रस्त्यावर अचानक टाटा सुमो गोल्ड गाडी आडवी झाली. त्यांना टँकर चालकांनी गाडी आडवी का लावली? असे विचारले असता व टँकरमधून खाली उतरलो असता गाडींच्या चालकाने मला थापड बुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली त्या गाडीवर महाराष्ट्र शासन लाल दिवा असून मागच्या साईडने SDM असे लिहिले होते. हा मारहाण करत असताना रस्त्यावर गर्दी जमा झाल्याने एक बस थांबली व त्यातील प्रवाशांनी भांडण सोडवली. अशी तक्रार जिंतूर पोलिस ठाणे येथे 8/1/2023 रोजी भादवी कलम 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.