मराठी पत्रकार संघाची “काव्यमैफिलला”अफाट जनसमुदायाने तब्बल तीन तास प्रत्येक कवितेला दिली दाद.
आमदार मेघना दीदी यांनी तब्बल तीन तास उपस्थित राहून काव्यमैफिलचा आनंद घेतला.

जिंतूर (अजमत पठाण)
जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून रविवार 15 जानेवारी रोजी शहरातील जुनी मुन्सफी येथे आयोजित करण्यात आलेल्या काव्यमैफिलीत सहभागी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवींनी पहाडी आवाजात वेगवेगळ्या विषयांवर दर्जेदार कवितांचे सादरीकरण केल्याने काव्यमैफिलीची संध्या चांगलीच रंगली होती. यावेळी उपस्थित अफाट जनसमुदायाने तब्बल तीन तास प्रत्येक कवितेला दाद दिली.
तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून जिंतूरकरांची साहित्यिक भूक भागविण्यासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवींची “काव्यमैफिल” आयोजित केली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मेघना बोर्डीकर यांची उपस्थिती होती तर उदघाटक म्हणून ब्रिजगोपाल तोष्णीवाल हे उपस्थित होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, प्राचार्य श्रीधर भोंबे, भाजपा तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, डॉ दुर्गादास कान्हडकर, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर, एम ए माजीद, प्रतिष्ठित व्यापारी सत्यनारायण शर्मा, देवेंद्र अण्णा भुरे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मते, प्रा बाळू बुधवंत, बालाजी सांगळे, ऍड सुनील बुधवंत, हकीम लाला आदींची उपस्थिती होती. या काव्यमैफिलीस ख्वाडा, बबन, छत्रपती शासन, लॅंड 1857, राजकुमार यासारख्या मराठी चित्रपटात गीत लेखन करणारे कवी, संगीतकार, लेखक, कथाकार प्रा डॉ विनायक पवार तसेच ‘मित्र वनव्यामध्ये गरव्या सारखा’ कवितेचे प्रसिद्ध कवि अनंत राऊत आणि साम टीव्ही मराठीच्या वृत्त निवेदिका तथा प्रसिद्ध कवयित्री यामिनी दळवी यांनी आई, बाप, मैत्री, प्रेयसी, माणूस, खरे प्रेम, वृद्ध आईची व्यथा आदींवर पहाडी आवाजात दर्जेदार कवितेचे सादरीकरण करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. शिवाय भोंगा या राजकीय कवितेवर वाहवाही मिळवली. तिन्ही कवींनी कधी विनोदी तर कधी गंभीर शैलीत तब्बल तीन तास रसिकांना खिळवून ठेवले तर उपस्थित जनसमुदायाने ही मनाला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक कवितेवर दाद दिली. काव्यमैफिलीचे सूत्रसंचालन विनोद पाचपिल्ले यांनी केले तर प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष शहेजाद खान यांनी केले तर आभार शेख शकील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख अलीम, रामप्रसाद कंठाळे, शेख वाजीद, सय्यद नसीर, एम एजाज, बालाजी शिंदे, राजू देशमुख, सिराजुद्दीन नदवी, रफिक तांबोळी, गजानन चौधरी, शम्मू पटेल, प्रभाकर कुरहे आदींनी परिश्रम घेतले.