परभणी येथे स्वामी रामदेव महाराजांचे इंटिग्रेटेड योगा शिबिर होणार.
पतंजलीचे राज्य प्रभारी बापू पाडाळकर यांची माहिती .

परभणी :-
परभणी येथे राजे संभाजी मित्र मंडळ व पतंजली परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने योग गुरु स्वामी रामदेव महाराज यांच्या इंटिग्रेटेड योगा शिबिराचे आयोजन दि 25,26 व 27 फेब्रुवारी रोजी करण्यात आल्याची माहिती पतंजलीचे राज्य प्रभारी बापू पाडाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय जाधव होते.
परभणी येथील विद्या नगर मधील वैष्णवी मंगल कार्यालयात रविवार दि 22 जानेवारी रोजी याबाबत पत्रकार परिषद व जिल्ह्यातील पतंजलीच्या कार्यकर्त्यांची नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय उर्फ बंडू जाधव होते. व्यासपीठावर पतंजलीचे राज्य प्रभारी बापू पाडाळकर, सुधाताई अळीमोरे, अतुल आर्य, उदय वाणी, अनुपमा जहागिरे,धोंडीराम शेप, प्रा बि टी राठोड, निखिल वंजारे, अनिल बडगुजर, गजानन चौधरी, पुनम खत्री, बालासाहेब गजमल, बापू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.पतंजलीचे राज्य प्रभारी बापू पाडाळकर व सुधाताई अळीमोरे यांनी फेब्रुवारी महिन्यात आयोजित केलेल्या इंटिग्रेटेड योग शिबिराची रीतसर माहिती सांगितली. सकाळी योग शिबिर तर सायंकाळी विशेष कार्यक्रम होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. खासदार संजय जाधव यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की, योग गुरु स्वामी रामदेव महाराज येणे ही आपल्या जिल्ह्यासाठी आनंदाची बाब आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला पाहिजे.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील पतंजलीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धोंडीराम शेप, बी.टी. राठोड, निखिल वंजारे, अनिल बडगुजर, गजानन चौधरी, पुनम खत्री, बालासाहेब गजमल, बापू देशमुख, डॉ संदीप चव्हाण, रोहित जगदाळे, श्रीधर दळवी यांच्यासह पतंजलीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.