उत्सवजिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रसामाजिक
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा कडून जिंतूर येथे श्री वासवी कन्यका आत्मार्पण दीन निमित्त महाआरती

जिंतूर (अजमत पठाण):-
आर्य वैश्य समाजाची कुलस्वामिनी, श्री वासवी कन्यका परमेश्वरी मातेचा आत्मार्पण दिन आज माघ शु द्वितीया रोजी महाआरती करून साजरा करण्यात आला.
सौंदर्य,शील,विद्या भूषिनी ही माता आहे ……अज्ञान रुपी तमाचा नाश करणारी ही जननी…..एकशे दोन गोत्रांचा उद्धार करण्यासाठी आजच्या दिवशी अग्निप्रवेश करती झाली.
तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज जिंतूर येथे श्री नगरेश्वर मंदिरात देवीची महापूजन व महाआरती , आणि पूजा करण्यात आली. .माता कन्यका आपणां सर्वांवर सदैव अशीच कृपादृष्टी ठेवो हीच तिच्या चरणी प्रार्थना संपूर्ण समाजा च्या उपस्थितीत करण्यात आली.