ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रराजकीय

शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण मिळाल्याने जिंतूरात शिंदे गटातर्फे जल्लोष.

जिंतूर (अजमत पठाण):-

                मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. शिंदे आणि ठाकरे गटाची केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाल्यानंतर आता आयोगाने मोठ्या निर्णय देत धनुष्यबाण हे चिन्ह व शिवसेना नाव एकनाथ शिंदे यांना दिले असून हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

                      याचीच औचित्य साधून जिंतूर आतील बाळासाहेबांची ( शिवसेना ) शिवसेना पक्षाच्या वतीने आज दि.१७ रोजी रात्री ८ : २० वाजण्याच्या सुमारास फटाके वाजून जिंतूरात अक्षता राजेश चक्कर पाटील यांच्या मार्गदर्शनात आनंद उत्सव करण्यात आला. यावेळी अंकुश भाऊ राठोड, राजेश चक्कर पाटील, गजानन गीते, लक्ष्मण महाराज चव्हाण, अशोक देशमुख, बापूराव चौरे, प्रल्हाद गीते, योगेश राठोड, राजू वाकळे, दशरथ महाराज, कार्तिक थिटे, लहू राठोड, मोतीराम चव्हाण, छत्रपती राठोड, सचिन राठोड, अभिषेक बनगर, निलेश चव्हाण अदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.