महाशिवरात्री निमित्त ब्रह्माकुमारिज कडून रॅलीचे आयोजन.
देखाव्याच्या माध्यमातून शिव परमात्म्याचा संदेश...

जिंतूर (अजमत पठाण):-
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय जिंतूर च्या संचलिका ब्रह्माकुमारी बी. के सुमन दीदी यांच्या मार्गदर्शानाखाली महाशिवारात्री च्या पावन पर्वावर शहरातील मुख्य रस्त्यावरून शनिवार दि.१८ फेब्रुवारीच्या सकाळी १० : ध्वज रोहन करून , भव्य शोभा यात्रा रॅली चे अयोजन करण्यात आले आहे. विविध देखाव्याच्या माध्यमातून परमपिता शिव परमातम्याचा इश्वरिय संदेश देण्यात येणार आहे. ब्रह्माकुमरिज च्या ज्ञानानुसार या भुतालावरील सर्व मनुष्य आत्म्याचा पिता हा एकच असून तो परमात्मा शिव आहे.
शिव परमात्मा नवीन सृष्टीच्या म्हणजे सतयुगाच्या निर्मितीसाठी या सृष्टीवर ८७ वर्षांपूर्वी अवतरीत झाला असून ब्रह्माकुमारिज् च्या माध्यमातून राजयोगाचा अभ्यास करुन घेऊन मनुष्य आत्म्याला दैवी गुणांनी परिपूर्ण करून नवीन युगाची तयारी करीत आहे. सर्व आत्म्याचा पिता असल्यामुळे सर्वांनी मोठ्या उत्साहाने शिव पित्याचा अवतरण दिवस साजरा करावा असे आव्हान यावेळी सुमन दीदींनी सर्व नागरिकांना केले.