उत्सवजिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

जिंतूरात महाशिवरात्र निमित्त भव्य शोभायात्रा.

शिवनामाच्या गजराने दुमदुमले शिवालय....

जिंतूर (अजमत पठाण)

              महाशिवरात्रीनिमित्त जिंंतुुर तालुक्यातील सर्वच शिवालय शिवनामाच्या गजराने दुमदुमली शहरास तालुक्यातील सशिवमंदिरात सर्वत्र शिवपिंडीला दुग्धाभिषेक करून त्या ठिकाणी भजन, प्रवचन, शिवलीलामृत, पारायण, पूजन आदी धार्मिक कार्यक्रमांनी नागरिकांनी महाशिवरात्री साजरी केली घरोघरी अबाल, वृद्धभाविक, महिला, तरुणींनी उपवास करून मोठ्या भक्ती भावाने शिवरात्र साजरी केली.

शिवरात्री निमित्त शहरातील श्री सिद्धेश्वर मंदिर, मळ्यातील सोमेश्वर मंदिर, हुतात्मा स्मारक परिसरातील सोमेश्वर मंदिर, श्री अमृतेश्वर मठ, श्री मैनापुरी देवस्थान आदी शिवालयात नागरिक, अबाल-वृद्ध, महिलांनी भल्या पहाटेपासूनच महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती तालुक्यातील पाचलेगाव येथील श्री मुक्तेश्वर आश्रम, येलदरी रस्त्यावरील माणकेश्वर शिवारातील महादेव मंदिर तसेच वडधुती येथील शिवमंदिरात ही नागरिकांची मोठी गर्दी होती.अनेक मंदिरात शिभक्तांसाठी थंड सरबत व अल्पोपहार ची नागरिकांनी व्यवस्था केली होती.

ब्रह्मकुमारी सेंटर तर्फे भव्य शोभायात्रा

शहरातील छत्रपती शिवाजी नगर मधील ब्रह्मकुमारी सेंटर मध्ये मुख्य संचालिका बी के सुमन दीदी, डॉ.अतुल जाधव, डॉ.पंडित दराडे, संतोष घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या वेळी बी के कल्पना दीदी, बी के नंदा दीदी, पत्रकार शेख शकील अहमद, अजमत पठाण, भागवत चव्हाण, महेश देशमुख, सचिन रायपत्रीवार, बाबा राज, संदीप माहुरकर,अ. माबुद खान, गुलाबराव शिंदे, रामप्रसाद कंठाळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यानंतर सेंटर मधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत भव्य शिवलिंग ऱ्य सोबतच लक्ष्मीनारायण चा सजीव देखावा व्यसन मुक्ती वर सजीव देखाव्या द्वारे समाज प्रबोधन करण्यात आले या वेळी बोलतांना सुमन दीदी म्हणाल्या की प्रत्येकाने सात्विक आहार घ्यावा ज्या द्वारे मानवी शरीर निरोगी राहील जमेल त्यांनी सेंटर ला येऊन दिवसातून थोडावेळ तरी एकाग्रचित्त बसून ध्यान धारणा (मेडिटेशन) करावे ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक,मुख्य चौक,श्री नृसिह चौक मार्ग जवाहर कॉलोनी स्थित ब्रह्मकुमारी सब सेंटर वर गेली.या ठिकाणी या ठिकाणी केंद्र संचालिका बी के सोनू दीदी यांच्या वतीने शोभयात्रेतील सर्वांना थंड सरबत व अल्पोपहार देऊन फटाक्याच्या आतिषबाजी ने स्वागत करण्यात आले.त्या नंतर संचालिका बी.के. सोनू दीदी, मुख्य संचालिका बी.के. सुमन दीदी,माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड, अनुप सोळंके, बी.के.नंदा दीदी, बी.के.कल्पना दीदी, स.पो.नि विकास कोकाटे, बालाजी सांगळे, नमिता सोळंके, लक्ष्मीताई चीद्रवार, सुरेश पारवे, रंजना भोंबे आदी मान्यवरांच्या उपस्थित मध्ये सेंटर वर ध्वजारोहण करण्यात आले आलेल्या सर्व मान्यवरांचे केंद्र संचालिका बी के सोनू दीदी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून त्यांना अल्पोपहार (टोली) देण्यात आली 

छप्पन भोग

शहरातील जवाहर कॉलनी मधील ब्रह्मकुमारी सेंटर च्या संचालिका बी के सोनू दीदी यांनी स्वतः तयार केलेल्या विविध प्रकारच्या छप्पन मिष्टाननचा शिवबाबाला भोग लावण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.