जिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयमराठवाडामहाराष्ट्ररस्ते महामार्ग

बस चालकास मारहाण केल्याबद्दल एकास दोन वर्ष कारावास.

जिंतूर (अजमत पठाण)

जिंतूर आगारातील एका बस चालकास शुल्लक कारणातून मारहाण केल्याबद्दल जिल्हा व सत्र न्यायालयाने एका व्यक्तीस दोन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली.

चारठाणा पोलीस ठाण्यात ज्ञानोबा श्रीराम पजई यांनी 17 ऑक्टोबर 2019 रोजी एक तक्रार दाखल केली, त्याद्वारे आपण सावरगाव (ता. जिंतूर )येथून बस घेऊन जिंतूरकडे जात असताना सकाळी सव्वानऊ वाजता कृष्णा सचिन राठोड (राहणार रायखेडा ता. जिंतूर) याने अचानक बस समोर मोटरसायकल आडवी लावून आपणास तू साईड का देत नाहीस म्हणून शिवीगाळ केली व बसच्या केबिनमध्ये चढून धक्काबुक्की करीत मारहाण केली असे नमूद केले.

 या तक्रारीच्या आधारे चारठाणा पोलिसांनी संबंधित आरोपी कृष्णा सचिन राठोड यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदान्वे गुन्हे दाखल केले, या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप अल्लापूरकर यांनी तपास करीत न्यायालयासमोर खटला उभा केला.

जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायमूर्ती श्रीमती के. एफ. एम. खान यांच्यासमोर सुनावणीत सरकार पक्षातर्फे सहा साठी साक्षीदार तपासण्यात आले त्यातून न्यायमूर्ती खान यांनी आरोपी राठोड दोषी ठरवून भादवि 353 अन्वये दोन वर्षे करावास, 332 अन्वये दोन वर्ष करावास, तसेच भादवी कलम 341 अन्वेय पंधरा दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली.

या प्रकरणात मुख्य सरकारी अभियोग्यता ज्ञानोबा दराडे,सहाय्यक संचालक अँड. सुहास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अँड. देवयानी सरदेशपांडे यांनी प्रकरणात पक्षातर्फे भक्कम बाजू मांडली. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती खान यांनी या तिन्ही वेगवेगळ्या गुन्ह्यात दोन वर्षे करावासाची शिक्षा ठोठावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.