अपघातजिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्ररस्ते महामार्ग

पिंपरीजवळ ओव्हरटेकच्या नादात दोन दुचाकीचा विचित्र अपघात; तिघेजण गंभीर जखमी. 

जिंतूर (अजमत पठाण)

जिंतूर – जालना महामार्गावरील पिंपरी गिते गावाजवळ ओव्हरटेक करणाच्या नादात मागील दुचाकीसमोर असलेल्या दुचाकीवर आदळून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांवरील तिघेजण गंभीररित्या जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

             गिरगाव बु. (ता.सेलू) येथील पवन रंजीत फड (वय 20 वर्ष) व त्याचे वडील रंजीत नामदेव फड (वय 50 वर्ष) हे दोघे बाप-लेक दुचाकी (क्रमांक एमएच 22 ए.एक्स 1242) वरून किराणा सामान खरेदी करण्यासाठी चारठाणा येथे येत होते तर त्यांच्या पाठीमागून अमोल महादेव दौंड (वय 30 वर्ष रा. वाई ता.सेलू) हे दुचाकी (क्रमांक एमएच 15 एच.एस.1245) हे वाई गावाकडे जात होते. दरम्यान, पिंपरी गावाजवळ वाई येथील दुचाकी गिरगाव बु.येथील दुचाकीवर पाठीमागून धडकली. या अपघातात दोन्ही दुचाकी खाली कोसळून तिघेजण घटनास्थळी कोसळले. दरम्यान ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने तिघा जखमींना चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर स्टाफ नर्स पाटेकर, सातपुते, संजय डोंबे यांनी प्रथमोपचार करून चारठाणा आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून रूग्नवाहिका चालक शेख इसाकोद्दीन यांनी जिंतूर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. यातील अमोल दौंड यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांंना परभणी येथे हलविण्यात आले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 

घटनास्थळी चारठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी वायाळ, पोहेका सिध्दार्थ आचार्य, दत्ता भदरगे, पोलीस नाईक विष्णूदास गरूड, पो.कॉ. पवन राऊत, चालक भालेराव आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली . दोन्ही दुचाकी ताब्यात घेतल्या असून या प्रकरणी शुक्रवारी संध्याकाळी उशिरापर्यंत चारठाणा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.