जिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रसामाजिक

जिंतूरात जयंती मिरवणुकीत डीजे वाजवल्या प्रकरणी गुन्हे दाखल.

पोलिसांनी डीजे केले जप्त.

जिंतूर (अजमत पठाण)

जिंतूर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दि.१४ एप्रिल शुक्रवार रोजी वेगवेगळ्या भागातून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. यामध्ये पोलिसांनी दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघन करून डीजे लावून ध्वनी प्रदूषण केल्याबद्दल शहरातील चार जयंती महोत्सव समिती अध्यक्षासह डीजे चालक मालकाविरुद्ध जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलिसांनी जयंती समिती अध्यक्षांना मिरवणुकीची परवानगी देत असतांना डी जे लावू नये या बाबत सूचना दिल्या होत्या. परंतु या सूचनांचे पालन न करता शहरातील चार ठिकाणच्या जयंती समिती अध्यक्षांनी विना परवाना डी जे लावून मिरवणूक काढली. यामध्ये खैरी प्लॉट येथील जयंती मिरवणूक समितीचे अध्यक्ष एड कपिल खिल्लारे यांनी वाहन क्रमांक एम एच ०६,जी ६३५ डी जे चालक मालक मनोज नामदेवराव जाधव,सिद्धार्थ नगर जयंती समिती अध्यक्ष आकाश प्रकाश चव्हाण यांनी वाहन क्रमांक एम एच ०४,एफ जे ८९४१ या वाहनावर डी जे लावला.तर भीम नगर जयंती समितीचे अध्यक्ष अक्षय सूर्यवंशी यांनी वाहन क्रमांक एम एच ०४ ई वाय २६७६ डी जे चालक जीवन दिलीप राठोड,भीम नगर येथीलच जयंती समिती अध्यक्ष वियज उत्तमराव गायकवाड यांनी वाहन क्रमांक एम एच ११ एफ ५९९३ डी जे मालक एकनाथ शहाजी डोबे यांनी पोलिसांच्या दिलेल्या परवानगीमधील अटी व शर्तीचे उल्लंघन करून सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषण संदर्भात पोलिसांनी आवाज कमी करण्याबाबत वेळोवेळी आदेश देऊनही त्याचे उल्लंघन केले.

        यावेळी पोलिसांनी डीजेचे वाहन क्रमांक एम.एच.०४- एफ जे. ८९४१ हे ताब्यात घेत असताना पोलिसांना गुंगारा देऊन डीजेसह वाहन चालक घेऊन निघून गेला. या बाबत अनुक्रमे दीपक भुसारे, निवृत्ती गिरी, चंद्र शेखर देशपांडे, लीला जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चार जयंती समिती अध्यक्ष व डीजे चालक मालकांवर जिंतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ३ डीजे वाहन ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.