जिल्हाताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविशेषसामाजिक
अरशीन खानम याचा पहिला रोजा पुर्ण.

जिंतूर (अजमत पठाण):-
शहरातील पठाण मोहल्ला येथील राहणार अफरोज खान पठाण यांच्या आठ वर्षीय मुलगी अरशीन खानम हिने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधुन दि. १६ एप्रिल रविवार रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला आहे.
रमजान महिन्यातील रोजाला मुस्लीम बांधवांमध्ये अनन्य साधारन महत्व असुन या महिन्यात मुस्लीम बांधव सलग 30 दिवस रोजा ठेवून रात्री तरावीह ची विशेष नमाज अदा करतात आणि याच महिन्यात लहान बालके आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात. याचीच प्रचिती म्हणून आठ वर्षीय अरशीन खानम हिने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण केला. म्हणुन तिच्या ह्या हिमतीचे काका सोहेल खान, फरोज खान, मामा अबरार लडले, एकरार लाडले, एकबल लाडले आदींनी कौतुक केले आहे.