जिंतूर तालुक्यातील पांगरी गावात विज कोसळल्याने एकाचा मृत्यू; दोन जखमी;.
अनेक शेळ्यांचा बळी

जिंतूर (अजमत पठाण)
जिंतूर तालुक्यातील पांगरी शिवारास बुधवारी सांयकाळी वादळी वाऱ्यासह ठोकर गारांसह पावसाने झोडपून काढले,या पावसातच अचानक विज कोसळल्याने मेंढी पाळ युवकाचा जागीच मृत्यू झाला; अन्य दोन जण गंभीर जखमी झाले तर 20 च्या वर शेळ्या दगावल्या.
घटना आज दि. 26 एप्रिल सायंकाळी 4;30 च्या सुमारास घडली असल्याची माहिती मिळत असून जखमींवर प्राथमिक उपचार ग्रामीण रुग्णालयात करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
जिंतूर तालुक्यात दि. 26 एप्रिल सायंकाळी 4;30 च्या सुमारास अचानक जोरदार वादळ वाऱ्यासह ठोकर गारांसह पावूस सूरू झाला. पांगरी येथील शेतकरी अंजीराम जाहाने यांच्या शेतात तीन युवक काम करत असताना या शेतात अचानक विज कोसळल्याने शेळीपालन करणारा युवक गणेश अजीराम जाहाने वय 17 जागीच मृत्यू पावला. त्याच्यासोबत असलेले बाळू मुंजाभाऊ लोणकर 19 वर्ष रा. चांदज ता. जिंतूर, माधव आत्माराम मांदळे 22 वर्षे रा. पांगरी ता. जिंतूर हे युवक गंभीर जखमी झाले. त्या अवस्थेत त्यांना भाजप तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत,नागेश आकांत,व इतर ग्रामस्थ नागरिकांनी रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता जखमींवर डॉ. गरड, सिस्टर शिंदे, रुग्ण कक्ष सेवक शेख अखिल बालाजी नेटके, गजानन घुगे आदीं कर्मचाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. दरम्यान विज कोसळल्याने 20 ते 25 शेळ्या मेल्याची बोले जात आहे, युवकांच्या शरिरावर वीज पडून मृत्यू झाल्याने पांगरी परिसरात शोककळा पसरली आहे घटनास्थळी महसूल विभागाचा पथक पंचनामासाठी दाखल झाला असल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने मिळत आहे.