जिल्हाताज्या घडामोडीनिवडणूकमराठवाडामहाराष्ट्रराजकीय

जिंतूर बाजार समितीसाठी 97.78 टक्के मतदान.

जिंतूर बाजार समितीसाठी शांततेत मतदान

जिंतूर (अजमत पठाण)

              जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या 18 जागेसाठी शुक्रवार 28 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 च्या दरम्यानच्या मतदानाच्या टप्प्यात मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. एकूण 97.78 टक्के एवढे लक्षणीय मतदान झाले आहे.

या निवडणुकीसाठी एकूण 18 जागेसाठी 36 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावर एकूण 6 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अंतिम 4 वाजेपर्यंत 97.59 टक्के एवढे मतदान झाले होते.

              यामध्ये, सहकारी संस्था मतदारसंघ : एकूण मतदान 598 पैकी 576, ग्रामपंचायत मतदारसंघ : एकूण मतदान 849 पैकी 841, व्यापारी मतदारसंघ : एकूण 64 पैकी 60, हमाल मापाडी : एकूण 27 पैकी 27 असे एकूण 1 हजार 538 पैकी 1 हजार 501 एवढे मतदान झाले.

       दरम्यान, शनिवार 29 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता जिंतूर तहसील कार्यालयात मतदानाची मोतमोजणी होणार असून निवडणूकीत विजयी होवून कोण गुलाल उधळणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.