रस्ता वर तर दुकाने खाली सां बा उपअभियंत्याचा प्रताप

जिंतूर (अजमत पठाण) :-
जिंतूर शहरातील मुख्य रस्ता सध्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग जिंतूर यांच्यामार्फत सिमेंट रोडने मजबुतीकरण करण्यात येत आहे परंतु येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे आणि उंटावरून शेळ्या हकण्याच्या प्रकारामुळे शहरातील मुख्य रस्ता हा दुकानांच्या दोन फूट वरी तर दुकाने खाली असा प्रताप समोर आला आहे.
यामुळे जिंतूर शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज संकुल यातील दुकानांमध्ये येत्या पावसाळ्यामध्ये मोठा दुष्परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे वास्तविक सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्त्याचे लेवल पाण्याचा उतार याचा परिपूर्ण अभ्यास करून या रस्त्याची उभारणी होणे गरजेचे असताना येथील उपविभागीय अभियंता मात्र नांदेड येथे बसून आपला कारभार रामभरोसे पणे जिंतूरात चालवीत आहेत आणि म्हणूनच की काय दुकाने खाली आणि रस्तावर अशा प्रकारचा कारभार जिंतूर येथे दिसून येत आहे एका मोठ्या ठेकेदाराकडून जिंतूर शहरात उत्तम प्रकारचं डांबरीकरण सिमेंट करण रस्ता होत आहे यासाठी लोकप्रिय आमदार मेघना दीदी बोर्डीकर यांनी पुढाकार घेऊन जिंतूर शहरात मुख्य रस्ता सिमेंटीकरण काम मंजूर करून आणले मात्र येथील बांधकाम खात्याचे उपअभियंता यांच्या नियोजन शून्य कारभाराचा परिणाम जिंतूर शहरकरांना भोगाव लागणार आहे कारण पावसाळ्याचे दिवस जवळ येत असतानाच हा सिमेंट रस्ता होत आहे हे उत्तम जरी असले तरी रस्त्यावर आणि दुकाने खाली या प्रकारामुळे दुकानदारांचे लाखोचे नुकसान होण्याचे संकेत दिसून येत आहेत या प्रकाराबद्दल खऱ्या अर्थाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडून योग्य प्रकारे सर्वेक्षण होऊन काम होणे जरुरी होते परंतु तसे होताना दिसून येत नाही तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्या च्या परिसराचा रस्ता सुद्धा आता डांबरीकरण च्या ऐवजी सिमेंट करण होणार आहे हे उत्तम आहे परंतु उच्च दर्जाच्या आणि योग्य त्या क्वालिटीमध्ये हे काम व्हावे अशी सर्व शिवप्रेमी नागरिकांची मागणी असून याबाबत वरिष्ठ बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंता यांनी लक्ष घालण्याची गरजेचेआहे.