पत्रकारांच्या प्रश्नावर व्हॉइस ऑफ मीडियाचे धरणे आंदोलन…
पञकारांच्या धरणे आंदोलनास अनेकांचा पाठींबा...

जिंतूर (अजमत पठाण)
पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांसाठी काम करणाऱ्या संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ११ मे रोजी संपूर्ण राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर धरणे आंदोलन करण्यात आले. त्याच्याच एक भाग म्हणून संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया व जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर शहरात देखील तहसील कार्यालयासमोर आज (गुरुवारी) एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान या आंदोलनाला झाड फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष गजानन देशमुख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अँड. सुनील बुधवंत,व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष रमेश दरगड,आडत व्यापारी असोसिएशनचे सचिन देवकर, प्रतिष्ठित व्यापारी ब्रिजगोपाल तोष्णीवाल, माहेश्वरी संघाचे पुरुषोत्तम पोरवाल, प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे, अँड मनोज सारडा, माजी नगरसेवक गोपाळ रोकडे, माजी नगरसेवक गणेश कुऱ्हे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष शरद चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे, माजी नगरसेवक संतोष आंधळे, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष उल्हास जिंतूरकर, माजी नगराध्यक्ष सचिन गोरे आदींनी भेटी देऊन आंदोलनास जाहीर पाठींबा दिला.
यावेळी पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात जिंतूर तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनावर, विजय चोरडिया, भागवत चव्हाण, मंचक देशमुख, महेश देशमुख, संदीप माहूरकर, सचिन रायपत्रीवार, अब्दुल माबुद खान, रामप्रसाद कंठाळे, शंकर जाधव, दिलीप माघाडे, राम रेघाटे, रामप्रसाद दराडे, रफिक तांबोळी, शेख अलीम, शेख शकील अहमद, पठाण शहेजाद खान, राजू गारकर, संतोष तायडे, खयूम खान, राजाभाऊ काळे, मनोज टाक, दिलीप देवकर, राजाभाऊ काकडे, शेख अहमद, बि.डी रामपूरकर, एम.एजाज, राहुल वावळे, काशिनाथ घुगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.